परमेश शिवमणी यांनी आज भारतीय तटरक्षक दलाचे २६ वे महासंचालक म्हणून स्वीकारला कार्यभार

परमेश शिवमणी यांनी आज भारतीय तटरक्षक दलाचे २६ वे महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. शिवमणी हे नेव्हिगेशन आणि दिशादर्शन क्षेत्राचे तज्ञ असून त्यांनी तटरक्षक दलाच्या महत्त्वाच्या सर्व जहाजांवर सेवा बजावली आहे. ते नवी दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालय तसंच विलिंग्डन इथल्या सुरक्षा सेवा स्टाफ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. २०१९ मध्ये त्यांचा राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.