परळीत व्यापाऱ्यांनी वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ आजपासून पुकारला बेमुदत संप

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये कटकारस्थान रचण्याच्या आरोपाखाली वाल्मीक कराड याच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचं वृत्त आहे. परळी शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला असून बाजारपेठ बंद आहे. वाल्मिक कराड याला आज केज इथल्या न्यायालयात हजर केलं जाणार असल्यामुळे केज न्यायालय परिसरामध्येही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, परळीत व्यापाऱ्यांनी वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ आजपासून बेमुदत संप पुकारला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.