डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्यांचं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. त्यांनी १२ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती.