डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. २१ जुलैला हे अधिवेशन सुरु झालं होतं. आज सकाळी ११ वाजता लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, बिहार मतदारयाद्या पुनरीक्षणावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यामुळे गोंधळ सुरु झाला. त्यामुळे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलं. १२ वाजता कामकाज सुुरु झाल्यावरही गोंधळ सुरुच राहिल्यानं अखेर लोकसभेचं कामकाज पुढच्या अधिवेशनापर्यंत संस्थगित करत असल्याचं सभापतींनी जाहीर केलं. 

 

या अधिवेशनात लोकसभेत एकूण १४ विधेयकं सादर झाली, त्यातली १२ विधेयकं मंजूर करण्यात आली. २८ आणि २९ जुलै रोजी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. त्याला प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलं. या अधिवेशनात लोकसभेमध्ये केवळ ३७ तास चर्चा झाल्याचं बिर्ला यांनी सांगितलं. 

 

राज्यसभेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी विरोधी सदस्यांनी दिलेले १८ स्थगन प्रस्ताव फेटाळले. त्यामुळे गोंधळ वाढला आणि राज्यसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलं. 

 

दुपारी २ वाजता राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर ऑनलाईन गेमिंग विधेयक २०२५ राज्यसभेच्या मंजुरीकरता मांडण्यात आलं. यादरम्यान घटनादुुरुस्ती विधेयक २०२५, केंद्रशासीत प्रदेश सुधारणा विधेयक २०२५ आणि जम्मू काश्मीर पुनर्स्थापना विधेयक २०२५ ही तीन विधेयकं संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आली. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही संस्थगित झालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.