डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन सिंदूरमधून भारताचं दहशतवादी हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर – गृहमंत्री

ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं दहशतवादी हल्ल्यांना अचूक, सडेतोड आणि त्वरित प्रत्युत्तर दिलं, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केलं. ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेचा हात असून हे दहशतवादी पाठवणाऱ्यांना आणि खुद्द त्या दहशतवाद्यांनाही आपण संपवलं. ऑपरेशन महादेवअंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या सुलेमान, अफगाण आणि जिब्रान या लष्कर-ए-तैय्यबाच्या दहशतवाद्यांना सशस्त्र दलांनी ठार केलं, तर ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए-तैय्यबाचं मुख्यालय उद्ध्वस्त केलं, याचा पुनरुच्चार शहा यांनी केला.

 

तत्पूर्वी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रधानमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी केली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.