राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कमल हासन यांच्यासह तमिळनाडूच्या इतर नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. यानंतर, बिहारच्या मतदार यादी पुनरीक्षणासह इतर विविध मुद्द्यांवर विविध राजकीय पक्षांकडून २८ स्थगन प्रस्ताव मिळाल्याची, आणि ते फेटाळल्याची माहिती सभागृहाचे उपसभापती हरिवंश यांनी दिली. त्यांनी विरोधकांना कामकाज सुरळीत चालू देण्याचं आवाहन केलं. शून्य प्रहर पुकारल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केल्यामुळे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
Site Admin | July 25, 2025 12:52 PM | Parliament Session 2025
राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
