संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी संसद भवन परिसरात बिहारच्या मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेविरोधात निदर्शनं केली. या निदर्शनात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार सहभागी झाले होते. संसदेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केला. तर, सत्ताधारी पक्ष हा लोकशाहीचा नाश करत असल्याचा आरोप काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी यावेळी केला.
Site Admin | July 24, 2025 1:22 PM | Parliament Session 2025
संसद भवन परिसरात विरोधकांचं निदर्शन
