विमा क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणूक वाढवणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी

विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक सध्याच्या ७४ टक्क्यावरून १०० टक्क्यावर नेणारं, सबका बिमा, सबकी रक्षा विधेयक राज्यसभेनं आज संमत केलं. या विधेयकात विरोधकांनी सुचवलेल्या अनेक सुधारणा सभागृहानं नामंजूर केल्या. या विधेयकामुळे परदेशी कंपन्यांना विमा क्षेत्रात अधिकाधिक भांडवल आणता येईल, तसंच अधिकाधिक नागरिकांना विमा संरक्षण मिळेल, असा विश्वास या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केला. अधिकाधिक कंपन्या या क्षेत्रात आल्यामुळे स्पर्धा वाढेल आणि विम्याचा हप्ता कमी होईल, तसंच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.