डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

लोकसभेत आज सरकारविरोधी घोषणा छापलेले कपडे घालून विरोधी पक्ष सदस्य सभागृहात आले होते. सभापती ओम बिरला यांनी त्याला हरकत घेतली. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनरर्चनेला विरोध दर्शवणाऱ्या घोषणा छापलेले कपडे परिधान करुन द्रमुकचे सदस्य सभागृहात आले होते. त्यांनी सभागृहाबाहेर जावं असं सभापतींनी सांगितलं, पण तसं न करता विरोधी पक्ष सदस्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे सभापतींनी कामकाज २ वाजेपर्यंत, आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.

 

राज्यसभेत  अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आधी एकदा १२ वाजेपर्यंत दुसऱ्यांदा २ वाजेपर्यंत, आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं आणि सर्वपक्षीय खासदारांना आपल्या दालनात चर्चेसाठी बोलावलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.