दोन्ही सभागृहात गदारोळ, कामकाज तहकूब

भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्यसैनिकांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधींनी पुकारलेल्या या आंदोलनाला उद्या ८३ वर्ष होत असून देशाच्या अविरत स्वातंत्र्यलढ्याचा हा निर्णायक टप्पा होता असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं. बिहारमधलं मतदारयाद्यांचं पुनरिक्षण आणि इतर विविध मुद्द्यांवर विविध पक्षांकडून आलेले २० स्थगन प्रस्ताव त्यांनी फेटाळले. त्याच्या निषेधात सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या अधिवेशनात व्यत्यय आल्यानं राज्यसभेच्या कामकाजाचे ५६ तास वाया गेले असल्याचं हरिवंश म्हणाले. गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज त्यांनी आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केलं.

 

लोकसभेत माजी सदस्य सत्यपाल मलिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदार याद्या पुनरिक्षणावर चर्चेची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. सभापतींनी आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर ३ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.