डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 5, 2024 8:25 PM | Paris Paralympics 2024

printer

पॅरालिंपिक : तिरंदाजीत मिश्र सांघिक रिकर्व्ह खुल्या गटात हरविंदर सिंह आणि पूजा या जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश

पॅरिस पॅरालिंपिकमध्ये तिरंदाज हरबिंदर सिंग आणि पूजा जात्यान यांनी मिश्र सांघिक रिकर्व्ह पात्रता सामन्यात पोलंडच्या मिलेना ओल्सवेका आणि लुकास च्लेक यांचा ६-० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर भारताची महिला धावपटू सिमरन हिने महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी १२ प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. 

 

दरम्यान, पुरुषांच्या ज्युडो स्पर्धेत ६० किलो वजनी गटात भारताच्या कपिल परमार याला इराणच्या खोरम बनिताबा याच्याकडून पराभव पत्करावा लागला. आता तो कास्यपदकासाठी ब्राझीलच्या एलिएल्टन डी ऑलिव्हिराशी लढत देईल.