डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 8, 2024 7:17 PM | Paris Olympics 2024

printer

पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेचा आज समारोप / पदकतालिकेत भारत १८व्या स्थानावर

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोप सोहळा आज रात्री होणार आहे. या कार्यक्रमात भारताचा ध्वज, स्पर्धेतला सुवर्णपदकविजेता तिरंदाज हरविंदर सिंह आणि धावपटू प्रीती पाल यांच्या खांद्यावर असेल. या स्पर्धेत एकंदर २९ पदकांची कमाई करून भारतानं पदकतालिकेत अठरावं स्थान पटकावलं आहे. ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कास्यपदकांसह भारतानं स्पर्धेच्या इतिहासातल्या आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. स्पर्धेतल्या शेवटच्या, महिलांच्या कायाक एकेरी प्रकारात भारताच्या पूजा ओझा हिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.