September 4, 2024 9:26 AM | Paris Paralympics

printer

पॅरीस पॅरालिंपिक्स स्पर्धेत भारताला मिळाली ५ पदकं

पॅरिस इथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पदकतालिकेत पाच पदकांची भर टाकली. महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दीप्ती जीवनजी हिने कास्य पदक पटकावलं तर पुरुषांच्या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य आणि मरियप्पन थंगवेलू याने कास्य पदक पटकावलं. भालाफेकीत अजित सिंह आणि सुंदर गुर्जर यांनी अनुक्रमे रौप्य आणि कास्य पदकाची कमाई केली.
दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व पदकविजेत्या खेळाडूंचं दूरध्वनीवरुन अभिनंदन केलं. आपल्या खेळाडूंचा देशाला अभिमान असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवरील आपल्या अभिनंदनपर संदेशांत म्हटलं आहे.