डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पॅरिस पॅरालम्पिकमध्ये नितेश कुमारला सुवर्ण, तर योगेश कथुनिया याला रौप्य पदक

पॅरिस पॅरालिम्पिकचा आजचा पाचवा दिवस भारतासाठी सकारात्मक ठरला. बॅडमिंटनपटू नीतेश कुमार यानं ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेल याचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं आणि भारताची पदकसंख्या नऊवर नेली. तत्पूर्वी भालाफेकपटू योगेश कथुनिया यानं रौप्यपदक पटकावलं. त्यानं ४२ मीटर २२ सेटींमीटर अंतरावर भाला फेकला. 

 

बॅडमिंटनपटू तुलसीमती मृगेशन हिनं मनीषा रामदास हिच्यावर मात करत अंतिम फेरीत धडक मारून आणखी एक पदक निश्चित केलं. आता तिचा पुढचा सामना चीनच्या प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे. तर मनीषा रामदास कास्यपदकासाठी डेन्मार्कच्या बॅडमिंटनपटूशी लढत देईल. तिरंदाजी स्पर्धेत अग्रमानांकित राकेश कुमार याचं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाउंड स्पर्धेतलं रौप्यपदक अगदी थोडक्यात हुकलं. त्यानं ३०पैकी ३० गुण मिळवून स्पर्धेला सुरुवात केली खरी, मात्र चीनच्या हे झिहाओ याच्यापेक्षा फक्त एक गुण कमी मिळाल्यानं त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी नेमबाज अवनी लेखरा हिच्याशी संवाद साधला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.