पॅरिस ऑलिम्पिक : भारताच्या पुरुष हॉकी संघाची उपान्त्य फेरीत आज जर्मनीविरुद्ध लढत

आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी, अथ्लेटिक्स, टेबल टेनिस आणि कुस्ती या प्रकारात होणाऱ्या स्पर्धेत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. हॉकीमध्ये आज भारताचा उपांत्य फेरीतील सामना जर्मनीशी होणार आहे. अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्क करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला कास्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं यावेळी मात्र सुवर्ण पदक पटकावण्याच्या उद्देशानं भारतीय संघ मैदानात उतरेल.