डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पॅरिस ऑलिम्पिक : बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिराग ही भारतीय जोडी पुढच्या फेरीत दाखल

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत पुरुष गटात अर्जुन बबुता आणि महिला गटात रमिता जिंदल यांना पदक मिळवण्यात अपयश आलं. अंतिम क्रमवारीत रमिता सातव्या स्थानावर तर अर्जुन चौथ्या स्थानावर राहिल्याने त्याचं पदक थोडक्यात हुकलं. बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी पुढच्या फेरीत गेली. त्यांचा सामना उद्या इंडोनेशियाच्या फजर अल्फीयान आणि मुहम्मज रियान अर्डिअंटो या जोडीशी होईल.

 

आज पुरुष हॉकीत भारत आणि अर्जेंटीनामधला सामना बरोबरीत सुटला. सामन्याच्या सुरुवातीला अर्जेंटीनाने भारतावर 1-0 अशी आघाडी घेतली, मात्र नंतर भारताच्या चमूने अर्जेंटीनाशी बरोबरी केली. पुढच्या फेरीत भारताचा सामना आयर्लंडबरोबर होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.