डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पॅरिस ऑलिम्पिक : भारताच्या अविनाश साबळेची पुरुषांच्या स्टीपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अविनाश साबळे याने काल ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्रातील बीडचा सुपुत्र असलेल्या अविनाशनं काल रात्री झालेली ही शर्यत पाचव्या क्रमांकानं पूर्ण करत ८ मिनिट आणि १५ पूर्णांक ४३ सेकंदांची वेळ दिली आणि अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं. येत्या ८ ऑगस्टला ही अंतिम फेरी होणार आहे.

 

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याला मात्र काल कास्य पदकानं हुलकावणी दिली. नेमबाजीमध्येही मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका यांचं कास्य पदक अवघ्या एका गुणानं हुकलं.

 

टेबल टेनिस सांघिक प्रकारात भारताच्या महिला खेळाडू मानिका बत्रा, श्रीजा अकुला, आणि अर्चना कामत यांनी रोमानियाच्या संघाचा 16 व्या फेरीत 3-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.