डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरिसमध्ये बॅडमिंटन नेमबाजी हॉकीसह विविध स्पर्धांमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष

पॅरिस ऑलिंपिक्सच्या आजच्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडू बँडमिंटन, २५ मिटर पिस्तुल. हॉकी, ज्यूडो तसचं जलतरण स्पर्धेत सहभागी होत आहे. पुरुषांच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना चीन तैपैईच्या चाऊ तियेन चेन बरोबर होणार आहे. दोन कांस्य पदक पटकावणारी मनु भाकर आज २५ मिटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत दाखल होत आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियन संघाबरोबर होणार आहे. भारतीय संघानं या आधीच उंपात्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ज्यूडोच्या ७८ किलो वजनी गटात आज भारताच्या तूलिका मान हिचा सामना क्यूबाच्या इडालिस ओरटिसपेरिस बरोबर होणार असून या स्पर्धेतील अंतिमसह सर्वच सामने आजच खेळवले जाणार आहेत.

तिरदांजीच्या संमिश्र सांघिक स्पर्धेत आज भारताची धीरज बोमदेवरा आणि अंकिता भकत यांच्या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या दायनन्द कोईरुनिसा आणि आरिफ पांगेस्तु यांच्याबरोबर होणार आहे. एथलेटिक्समधील आज होणाऱ्या महिलांच्या ५ हजार मिटर तर पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत भारताचा तेजेंद्र पाल सिंह तूर पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत. भारतीय गोल्फ खेळाडू गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा आणि जलतरण पटू नेथरा कुमानन तसचं विष्णू सर्वानन हे खेळाडूही संबंधित स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.

पॅरिस ऑलिंपिक्समध्ये कांस्य पदक पटकावल्याबद्दल मध्य रेल्वेनं स्वप्निल कुसळे याला बढती दिली आहे. पुणे विभागात तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत असलेल्या स्वप्निलची बढती आता राजपत्रित अधिकाऱ्यांच्या गट ब श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी काल ही घोषणा केली.