युवा पिढीला परीक्षेच्या तणावापासून मुक्त करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाने देशव्यापी चळवळीचं स्वरूप घेतल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा २०२६ मध्ये ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्यासाठी यंदा ४ कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या ३ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त नोंदणीच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला मागे टाकल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ हे बहुप्रतिक्षीत व्यासपीठ विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एकत्र येऊन पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्याची संधी देतं, असं ते म्हणाले.
Site Admin | January 10, 2026 6:44 PM | PARIKSHA PE CHARCHA
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी यंदा चार कोटींपेक्षा अधिक जणांची नोंदणी