परिक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी यावर्षी विक्रमी नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी यावर्षी विक्रमी नोंदणी झाली आहे.  यामध्ये परदेशी विद्यार्थ्यांचं प्रमाणही लक्षणीय आहे, अशी माहिती  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे.  या कार्यक्रमासाठीच्या नोंदणीला 14 डिसेंबर 2024 ला सुरुवात झाली असून, आज शेवटचा दिवस आहे.  कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी  mygov.in वर लवकरात लवकर नोंदणी करण्याचं आवाहन मंत्रालयाने केलं आहे.  या उपक्रमाचं हे आठवं सत्र असून परिक्षा म्हणजे  शिक्षणाचा उत्सव असल्याची भावना लोकांमध्ये जागत असल्याचं मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.