प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या अभिनव उपक्रमाच्या ९व्या आवृत्त्तीच्या पार्श्वभूमीवर मायगव्ह – या पोर्टलवर देशव्यापी स्पर्धा सुरु आहे. ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित ही स्पर्धा ११ जानेवारीपर्यंत खुली राहणार आहे. इयत्ता ६ ते १२ वी पर्यंतचे विदयार्थी तसंच पालक आणि शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम जानेवारी २०२६ मध्ये आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात भारतातले तसंच परदेशातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक परीक्षेमुळे येणाऱ्या तणावावर प्रधानमंत्र्यांशी संवाद चर्चा करतील. २०२५ मध्ये परीक्षा पे चर्चा कार्यक्रमानं २४५ हून अधिक देशातल्या विदयार्थ्यांच्या सहभागाचा जागतिक विक्रम नोंदवला आहे.
Site Admin | December 6, 2025 2:49 PM | PARIKSHA PE CHARCHA
परीक्षा पे चर्चा या अभिनव उपक्रमाच्या ९व्या आवृत्त्तीच्या पार्श्वभूमीवर मायगव्ह – या पोर्टलवर देशव्यापी स्पर्धा सुरु