डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाला गिनेसच्या जागतिक विक्रमांच्या यादीत स्थान

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाला गिनेसच्या जागतिक विक्रमांच्या यादीत स्थान मिळालं आहे. ‘नागरिकांचा सहभाग असलेल्या ऑनलाइन प्रणालीवर एका महिन्यात सर्वाधिक नोंदणीचा’  जागतिक विक्रम परीक्षा पे चर्चानं केला आहे. माय गव्ह या प्रणालीवर परीक्षा पे चर्चाच्या आठव्या भागासाठी तीन कोटी ५३ लाख नागरिकांनी नोंदणी केली होती. त्याची दखल घेऊन गिनेसनं जागतिक विक्रमांच्या यादीत नोंद केली आहे. या जागतिक विक्रमाबाबतचं अधिकृत प्रमाणपत्र नवी दिल्लीत काल प्रदान करण्यात आलं. 

 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला उपस्थित होते. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी परीक्षेच्या ताणतणावाचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं थेट विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतात.