भारतीय कृषि व्यवस्था जागतिकीकरणाकडे जात असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन

भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सध्या देश कृषि उत्पादन निर्यातीमध्ये जगात अग्रेसर ठरत आहे, असं ते म्हणाले.