May 19, 2025 3:13 PM | Parbhani

printer

परभणी शहरात अमली पदार्थांची नशा  करताना २१ जणांना अटक

परभणी शहरात कॅफेच्या नावाखाली सुरु असलेल्या अवैध हुक्का पार्लरमधून अमली पदार्थांची नशा  करताना २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

तिथून १ लाख २४ हजाराची रोख रक्कम आणि हुक्क्याचं  साहित्य पोलिसांनी  ताब्यात घेतलं असून कॅफे मालकासहित २१ ग्राहकांवर गुन्हा दाखल केला आहे.