परभणी जिल्ह्यात दैठणा इथं १० लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतल्या ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख रूपयांचा मुददेमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाने पत्रकाव्दारे दिली आहे.
घराचं बांधकाम करताना सापडलेलं सोनं स्वस्तात विकत देऊ असं सांगून ही फसवणूक करण्यात आली. माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ही कारवाई केल्याचं पत्रकात म्हटलं आहे.