पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेला आजपासून प्रारंभ

दिव्यांगांसाठीच्या पॅरालिंपिक स्पर्धेला आजपासून पॅरीस इथं सुरुवात होत आहे. या स्पर्धा येत्या ८ सप्टेंबर पर्यंत चालणार आहेत. एकूण २२ क्रीडाप्रकारांचा स्पर्धेत समावेश असून त्यातल्या १२ खेळांमधे भारताचा ८४ जणांचा संघ सहभागी होणार आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पॅरालिंपिक संघ आहे. पॅरा सायकलिंग, पॅरा ज्युडो आणि पॅरा रोइंग या प्रकारांत प्रथमच भारतीय क्रिडापटू आपलं कौशल्य अजमावणार आहेत. २०२० मध्ये झालेल्या टोकिओ ऑलिंपिकचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू सुमित अंतिल आणि अथलीट भाग्यश्री जाधव उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील.