डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेचा कालचा पाचवा दिवस भारतासाठी आनंददायक ठरला ठरला. दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह पदक तालिकेत भारत १५ व्या क्रमांकावर पोहोचला. सुमीत अंटीलनं भालाफेकीत मिळवलेलं सुवर्णपदक हे कालच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य ठरलं. सुमीतनं ७० पूर्णांक ५९ शतांश मीटरवर भालाफेक करून पॅरालिम्पिकमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. बॅडमिंटनमध्ये पुरूष एकेरीच्या SL3 मध्ये नितेश कुमारनं सुवर्णपदक जिंकलं. तर सुहाज यतिराज यानं SL4 इव्हेंटमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. बॅडमिंटनच्या महिला एकेरीत तुलसीमती मुरुगेसन हिनंही रौप्यपदक मिळवलं. याशिवाय बॅडमिंटनमध्ये तसंच तिरंदाजीत मिश्र सांघिक प्रकारात कास्य पदकं मिळाली. तत्पूर्वी थाळीफेकीत योगेश कथुनियानं रौप्यपदक मिळवलं. या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केलं आहे. आज स्पर्धेच्या सहाव्या दिवशी नेमबाज अवनी लेखरा दुसरं सुवर्ण पदक मिळवण्याच्या आशेनं अंतिम फेरीत उतरेल. पुरुषांच्या उंच उडीच्या अंतिम फेरीतही मरियप्पन थंगावेलू याच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे.