नवी दिल्लीत झालेल्या दिव्यांगांसाठीच्या अथलेटिक्स स्पर्धांमधे भारतानं काल ३ पदकं जिंकली त्यामुळे आता भारताची पदक संख्या १८ झाली आहे. यामध्ये ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदके आहेत. ही भारताची ऐतिहासिक कामगिरी असून पदकतालिकेत भारत सहाव्या स्थानी आहे. काल एकता भुयान हिनं क्लब थ्रो मध्ये, सोमन राणानं शॉट पुट मध्ये रौप्य पदक तर प्रवीण कुमारनं उंच उडी मध्ये T64 गटात कांस्य पदक मिळवलं.
सर्वाधिक १२ सुवर्णपदकं ब्राझिलच्या संघाला मिळाली. ९ सुवर्णपदकं मिळवून चीन दुसऱ्या तर ८ मिळवून पोलंड तिसऱ्या क्रमांकावर राहिला.