December 3, 2025 3:36 PM | Pannalal Surana

printer

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचं निधन

राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा याचं काल निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचं आज देहदान करण्यात आलं. पन्नालाल सुराणा हे दैनिक मराठवाडा या वृत्तपत्राचे माजी संपादक होते. ग्रामोदय समिती कुर्डवाडीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंं होतं. दुष्काळ निवारण, शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलने केली. समाजवादी विचारवंत, साहित्यिक आणि उत्तम वक्ता अशीही त्यांची ख्याती होती. १९९३ सालच्या भूकंपानंतर त्यानी नळदुर्ग गावात ‘आपलं घर’ नावाचा मोठा प्रकल्पही उभारला होता. 

 

राज्याच्या समाजकारण आणि राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेला आहे. या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.