November 8, 2024 2:44 PM

printer

बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पंकज अडवाणीचा सामना सौरव कोठारीशी होणार

कतारमधे दोहा इथं सुरू असलेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज पंकज अडवाणीचा सामना सौरव कोठारीशी होणार आहे.

 

गतविजेत्या पंकजनं काल रात्री ध्रुव सितवालाचा ४-३ असा पराभव केला तर सौरव कोठारीनं ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह मिफसूदला नमवलं. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा सामना सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टशी होणार आहे.