श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलनउद्यापासून पंजाबमध्ये जालंधर इथे सुरू

देशातल्या सर्वात जुना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महोत्सव म्हणून ओळखला जाणारा दीडशेवा श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन उद्यापासून पंजाबमध्ये जालंधर इथे सुरू होत आहे. तीन दिवस चालणारा हा महोत्सव शिखांचे गुरू तेग बहादूर यांचा साडे तीनशेवा शहीद दिन आणि यंदा निधन झालेले बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडीत छन्नुलाल मिश्रा यांच्या स्मृतींना समर्पित असेल. या महोत्सवात विदुषी अवस्थी, पंडित साजन मिश्रा, पंडित रोणू मुजुमदार, अश्विनी भिडे, पंडित संजीव अभ्यंकर, सस्किया राव-दे-हास, व्ही सेल्वागणेश, नवीन शर्मा आणि शिखरनाद कुरेशी आपली संगीत कला सादर करतील.