हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यात शौर्य स्मारकासाठी सुरू असलेले भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात आहॆ. आगामी शौर्यदिनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत स्मारकाचे भूमिपूजन केलं जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री कार्यालय आणि सांस्कृतिक कार्यविभाग अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केला. खारगे यांनी आज पानिपतमधील शौर्य स्मारकाची पाहणी केली. त्याआधी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्मारकाबाबत आढावा बैठक घेतली.
Site Admin | June 27, 2025 6:44 PM | Panipat
पानिपत जिल्ह्यात शौर्य स्मारकासाठी सुरू असलेले भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात
