डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात स्वच्छता अभियानाला सुरुवात

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं स्वच्छता अभियानाला आजपासून सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. आज सकाळी शहरात ४२ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात १४८ टन कचरा गोळा करण्यात आला. आषाढी वारीच्या आधीची ही स्वच्छता मोहीम असून वारीनंतरही अशी मोहीम राबवली जाणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं. पंढरपूर हे संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचं आणि पवित्र धार्मिक ठिकाण असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे,  पंढरपूर कॉरिडॉर सर्वांच्या संमतीने पूर्ण केलं जाईल, असंही गोरे यावेळी म्हणाले. यावेळी  जयकुमार गोरे यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा