January 1, 2026 10:37 AM | GST | Tobacco

printer

एक फेब्रुवारीपासून तंबाखूच्या उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू होईल

नववर्षात एक फेब्रुवारीपासून तंबाखूच्या उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पान मसाल्यावर नवीन उपकर आकारला जाणार आहे. हे कर वस्तू आणि सेवा करा व्यतिरिक्तचे कर असतील. पान मसाला, सिगारेट, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवर 40 टक्के जीएसटी दर लागू होईल, तर बिडीवर 18 टक्के वस्तू आणि सेवा कर लागेल. याव्यतिरिक्त, पान मसाल्यावर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर आकारला जाईल, तर तंबाखू आणि संबंधित उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जाईल.