Palghar : रेल्वे प्रकल्पांच्या भूसंपादनाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पालघर जिल्ह्यातल्या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आज पालघर इथं एक उच्चस्तरीय बैठक झाली.  या बैठकीत डीएफसीसी अर्थात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, विरार–डहाणू रेल्वे चौपदरीकरण, मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन, बोरीवली–विरार पाचवी आणि सहावी मार्गिका तसचं रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पांशी संबंधित भूसंपादन तसंच अनुदान वितरणासह अन्य अडचणींविषयी  सखोल चर्चा झाली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.