पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या ५८ हजार ६६२ महिलांनी लखपती दीदी अभियानाच्या माध्यमातून आपलं वार्षिक उत्पन्न लाखाच्या पुढे नेलं आहे. शेतीपूरक व्यवसाय, अन्नप्रक्रिया, दुग्धव्यवसाय, लघुउद्योग आणि सेवा क्षेत्रात या महिलांचं मासिक उत्पन्न १० ते १२ हजारांपर्यंत पोचलं आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात एकूण ७३ हजार २५५ महिलांना या अभियानात समाविष्ट करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं.
Site Admin | March 17, 2025 3:47 PM | Palghar District
पालघरमध्ये लखपती दीदींचं वार्षिक उत्पन्न लाखाच्या घरात
