पालघर जिल्ह्यातल्या जव्हार सार्वजनिक विभागातल्या कंत्राटदारांच्या अनामत ठेवींचा घोटाळा करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना जव्हार दंडाधिकारी न्यायालयानं २९ डिसेंबर पर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत रवाना केलं आहे.
बनावट स्वाक्षऱ्या असलेल्या धनादेशाच्या आधारे सरकारी खात्यातून १११ कोटी ६३ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
या प्रकरणी त्यांना अटक करून यापूर्वीही पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. मात्र जमीन मंजूर करण्यात आल्यामुळं त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.