डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 10, 2025 6:18 PM | Palghar

printer

जव्हारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण

पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये आज दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं  लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. आदिवासीबहुल जव्हार तालुक्यामधल्या  नागरिकांना आता न्याय मिळविण्यासाठी लांब प्रवास करावा लागणार नाही. अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा नव्या न्यायालय भवनामुळे आदिवासी आणि दुर्गम भागातल्या  न्यायालयीन प्रक्रियेच्या वेगवान पर्वाची आता सुरुवात झाली आहे, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा