ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये आज पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढली गेली. या रॅलीत विकिलीक्सचे संस्थापक ज्यूलियन असांज, सिडनीच्या महापौर क्लोव्हर मूर आणि निवृत्त फुटबॉलपटू क्रेग फॉस्टर देखील सहभागी झाले होते. पॅलेस्टिनला देश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. मेलबर्नमध्येही याच मागणीसाठी सुमारे २५ हजार नागरिकंनी मोर्चा काढला.
दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाउनमध्येही मदर्स फॉर गाझा या चळवळीतल्या महिला सदस्यानेही गाझामधल्या हत्या आणि उपासमारीच्या संकटाविरोधात निदर्शनं करत इस्रायलवर कारवाई करायची मागणी केली.