यूके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडून पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता

यूनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टारमर यांनी एका व्हिडिओ निवेदनात ही घोषणा केली. शांतता आणि समाधानाच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नि यांनी देशाच्या शांततेसाठी या मान्यतेला दुजोरा दिला. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी देखील संयुक्त निवेदनाद्वारे पॅलेस्टाईनला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता दिली.