पाकिस्तानात, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या घटना दुरुस्ती विरोधात वकिलांचा संप

पाकिस्तानात सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या २७व्या घटनादुरुस्तीविरोधात वकिलांनी संप पुकारला आहे. न्यायाधीशांनी देखील आपापल्या पदाचे राजीनामे देऊन निषेध नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. आतापर्यंत पाकिस्तानचे सरन्यायाधीश सईद मन्सूर अली शाह यांच्यासह दोन न्यायाधीशांनी राजीनामा दिला आहे. ही घटनादुरुस्ती म्हणजे संविधान आणि न्यायपालिकेवर हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या घटनादुरुस्तीने संरक्षण दलांचे प्रमुख हे पदआणि नवीन संवैधानिक न्यायालय स्थापन होणार आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी गेल्या गुरुवारी घटनादुरुस्ती विधेयकावर स्वाक्षरी केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.