डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 19, 2025 3:27 PM | India | Pakistan

printer

दहशतवादाविरुद्ध लढण्यात आघाडीवर असल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे विडंबना – भारत

दहशतवादाविरुद्ध लढण्यात इस्लामाबाद आघाडीवर असल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे विडंबना आहे, असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरिश यांनी काल म्हटलं. संयुक्त राष्ट्रांनी सूचिबद्ध केलेल्या २०हून अधिक दहशतवादी संघटनांना आश्रय देणारा पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचं केंद्र आहे. त्यामुळे असा देश जेव्हा दहशतवादाविरुद्ध आघाडीवर असल्याचा दावा करतो, तेव्हा ती एक विडंबना ठरते, असंही ते यावेळी म्हणाले. पाकिस्तानचे उप प्रधानमंत्री इशाक दार यांनी केलेल्या कश्मीरवरच्या वक्तव्यालाही हरिश यांनी प्रत्युत्तर दिलं. जम्मू काश्मीरच्या काही भागावर पाकिस्तानने बेकायदेशीर ताबा मिळवला आहे. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत स्थानिकांनी मतदानातून भारताप्रतिची निष्ठा स्पष्ट केल्याचं हरिश यांनी निदर्शनाला आणून दिलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.