डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या X अकाऊंटवर भारतात बंदी

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या एक्स अकाऊंटवर आज भारताने बंदी घातली. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चोहोबाजूंनी नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे. त्या अंतर्गतच ही कारवाई करण्यात आली आहे. 

 

राजस्थानच्या श्रीगंगानगर इथं भारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं. या पाकिस्तानी सैनिकाची सीमा सुरक्षा दलाकडून चौकशी सुरू आहे. यानंतर सीमा सुरक्षा दलाने श्रीगंगानगर भागात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविली आहे. 

 

दरम्यान, आज पहाटे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्याचं वृत्त आहे. कुपवाडा, बारामुल्ला, राजोरी, पूंछ भागामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.