December 20, 2025 12:58 PM | Imran khan | Pakistan

printer

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला कैदेची शिक्षा

पाकिस्तानातल्या न्यायालयानं तोषखाना घोटाळ्याप्रकरणी पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना १७ वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय १ कोटी ६४ लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही त्यांना ठोठावला आहे. सौदी अरेबियाच्या सरकारकडून २०२१ मध्ये मिळालेल्या भेटवस्तू सरकारी खजिन्यात जमा न करता परस्पर विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दुसऱ्या एका प्रकरणात शिक्षा झाल्यानं दोघेही सध्या कारागृहात आहेत.