पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधू नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून सखल भागातल्या गावांमधले हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे या भागातलं पशुधनही बाधित झालं आहे.
सरगोधा, फैसलाबाद, आणि इतर शहरांमध्ये तसंच लाहोर, गुजरांवाला आणि रावळपिंडी या शहरांमध्ये काल मुसळधार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारानं संपूर्ण पंजाब प्रांताला रेड अलर्ट जारी केला आहे.