November 11, 2025 7:36 PM

printer

पाकिस्तानात झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान 12 जण ठार, 21 जण जखमी

पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे न्यायालयाच्या इमारतीबाहेर झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान 12 जण ठार तर 21 जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार स्फोट न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनात झाला.

 

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानला विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात सुरक्षेच्या समस्या भेडसावत आहेत. दरम्यान, पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने खैबर पख्तूनख्वा येथील बिघडत्या सुरक्षा आणि मानवाधिकार स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.