November 16, 2025 7:37 PM | afghanistan pakistan

printer

१ जानेवारीपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पाकिस्तानमध्ये १ लाखापेक्षा जास्त अफगाण नागरिक बंदी

पाकिस्ताननं यंदाच्या १ जानेवारीपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत १ लाखापेक्षा जास्त अफगाण नागरिकांना बंदी बनवल्याचं UNHCR, अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्तालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.  बलुचिस्तानमध्ये चांगाई आणि क्वेट्टा, तर पंजाब प्रांतात सर्वाधिक संख्येनं अटक झाली असून, यापैकी केवळ २४ टक्के लोकांकडे अफगाणिस्तानच्या नागरिकत्वाची नोंदणी कार्ड  होती, असं यात म्हटलं आहे. 

इस्लामाबाद आणि रावळपिंडी इथून अफगाण स्थलांतरितांना बाहेर काढण्याच्या, तसंच पोलिसांना नोंदणी कार्ड धारकांना अटक करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारी आदेशानंतर अटकेचं प्रमाण वाढल्याचं यात म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.