डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला अमेरिकेचा पाठिंबा

दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारताला सर्वतोपरी मदत करेल, असं अमेरिकेच्या संसदेचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी म्हटलं आहे. भारत अमेरिकेचा महत्वपूर्ण भागीदार असल्याचंही ते म्हणाले. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार कराराबाबतही त्यांनी विचार मांडले. दोन्ही देशाच्या व्यापार वाटाघाटी यशस्वी होतील, अशी अशा त्यांनी व्यक्त केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ट्रम्प प्रशासनानं भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.