पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज जम्मू इथल्या एनआयए विशेष न्यायालयासमोर एकंदर सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. लष्कर-ए-तैयबा आणि द रेझिस्टन्स फ्रंट या दोन दहशतवादी संघटनांवरही एनआयएनं आरोप लावले आहेत. १५००पेक्षा जास्त पानांच्या या आरोपपत्रात पाकिस्तानी दहशतवादी साजिद जट्ट याच्यासह ऑपरेशन महादेवअंतर्गत सुरक्षादलांच्या कारवाईत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांचाही आरोपपत्रात समावेश आहे.
Site Admin | December 15, 2025 8:06 PM | Pahalgam attack
Pahalgam Attack : NIA कडून आरोपपत्र दाखल