डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पद्म हा नागरी सन्मान देऊन गौरवण्यात येतं.  कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, क्रीडा, प्रशासकीय सेवा अशा विविध क्षेत्रात हे पुरस्कार दिले जातात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सरकारनं १३९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले होते.

 

त्यामध्ये ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या नामवंतांमध्ये प्रख्यात व्हायोलिनवादक आणि संगीतकार डॉक्टर एल सुब्रमण्यम, यांचा समावेश आहे.  ख्यातनाम संपादक तसंच  प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष ए सूर्यप्रकाश, चित्रपट अभिनेते अनंत नाग, नंदमुरी बालकृष्ण आणि एस. अजित कुमार यांना पद्मभूषण सन्मान जाहीर झाला आहे. पद्मश्री सन्मानप्राप्त मान्यवरांमधे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्युत पालव, शास्त्रीय गायिकी अश्विनी भिडे- देशपांडे यांचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा